बाईपणाचा प्रवास दाखवणारं नाटक आणि ड्रामा स्कूल, मुंबई
'स्वतःच्या नवऱ्यापासून मूल होत नसेल तर त्याला सोडून दुसरा घरोबा कर, माझी मुलं तुला सुख द्यायला सक्षम आहेत', असं सांगणाऱ्या बाईला सडेतोड जवाब देण्याइतका स्वाभिमान माटीत आहे. पण तीचं एकाकीपण तिला दिवसेंदिवस उदध्वस्त करत जातं, तिची निरागसता शोषून तीला शुष्क करतं... सरतेशेवटी भावनेच्या उद्रेकात ती नवऱ्याला- प्रेम आणि मूल देण्यासाठी अक्षम असणाऱ्या पुरुषाला- संपवते.......